अश्विन यादव उपसरपंचपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अश्विन यादव उपसरपंचपदी
अश्विन यादव उपसरपंचपदी

अश्विन यादव उपसरपंचपदी

sakal_logo
By

gad235.JPG :
58224
अश्विन यादव
--------------------------
अश्विन यादव उपसरपंचपदी
गडहिंग्लज, ता. २३ : हिरलगे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विन यादव यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच सचिन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड केली. सुकाणू समितीच्या धोरणानुसार संदीप कुंभार यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. या रिक्त पदाच्या निवडीसाठी विशेष सभा झाली. अश्विन यादव यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली. निवडीनंतर श्री. कुंभार यांच्या हस्ते श्री. यादव यांचा सत्कार केला. ग्रामपंचायत सदस्य शंकर लोखंडे, अनिता शिंदे, संगीता कुंभार, श्वेता देसाई, अंजना कुपेकर, ग्रामसेवक समाधान माने आदी उपस्थित होते.