महामार्ग बाधित शेतकऱ्यांची ५ नोव्हेंबर रोजी परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्ग बाधित शेतकऱ्यांची ५ नोव्हेंबर रोजी परिषद
महामार्ग बाधित शेतकऱ्यांची ५ नोव्हेंबर रोजी परिषद

महामार्ग बाधित शेतकऱ्यांची ५ नोव्हेंबर रोजी परिषद

sakal_logo
By

महामार्ग बाधित शेतकऱ्यांची
५ नोव्हेंबर रोजी परिषद
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम लवकरच सुरु होणार आहे. या महामार्गात बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येत संघटना स्थापन केली आहे. या संघटनेतर्फे ५ नोव्हेंबरला परिषद होणार आहे. येथील राम मंदिरात दुपारी बाराला ही परिषद होईल. तत्पूर्वी, रविवारी (ता. ३०) संकेश्वर ते आंबोली दुचाकी रॅली काढली जाणार आहे.
संकेश्वर-बांदा महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या दहापट मोबदला मिळावा, मोबदला मिळण्याची निवाडा नोटीस वहिवाटीप्रमाणे द्यावी, प्रत्येक बाधित शेतकऱ्याला पूर्ण मोबदला मिळत नाही तोवर महामार्गाचे काम सुरु करु नये, महामार्गाच्या कामात स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार द्यावा यासह विविध दहा मागण्यांसाठी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी लढा उभारला आहे. गावोगावी जनजागृतीसाठी कोपरा सभा व शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.
दरम्यान, ५ नोव्हेंबराला परिषद होणार आहे. शेतकरी सभेचे राज्य संघटक दिगंबर कांबळे, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, धरणग्रस्त संघटनेचे राज्य संघटक धनाजी गुरव, अशोक जाधव, ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक आदी मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेला व जनजागृतीसाठी निघणाऱ्या संकेश्वर-आंबोली दुचाकी रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन महामार्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी केले आहे.