भडगावच्या ‘बसवेश्‍वर’तर्फे रिबेट वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भडगावच्या ‘बसवेश्‍वर’तर्फे रिबेट वाटप
भडगावच्या ‘बसवेश्‍वर’तर्फे रिबेट वाटप

भडगावच्या ‘बसवेश्‍वर’तर्फे रिबेट वाटप

sakal_logo
By

58359
भडगाव : बसवेश्‍वर दूध संस्थेतर्फे दूध उत्पादकांना भेटवस्तूंच्या वितरण प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी.


भडगावच्या ‘बसवेश्‍वर’तर्फे रिबेट वाटप
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील श्री बसवेश्‍वर दूध संस्थेतर्फे दिवाळी सणानिमित्त रिबेट वाटप करण्यात आले. भीमराव पाटील यांच्या हस्ते रिबेट वाटपाचा प्रारंभ करण्यात आला. सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांचा सत्कार झाला. राजेंद्र विभूते, केंपान्ना मोर्ती, शांता नाईक, संतोष चौगुले यांनी अनुक्रमे म्हैस दुधाचा तर, संजय राजमाने, सागर चिंचेवाडी, आत्माराम पाटील, कलगोंडा पाटील यांनी अनुक्रमे गाय दुधाचा सर्वाधिक पुरवठा केला. म्हैस दुधास शेकडा १५ टक्के प्रमाणे तर गाय दुधास शेकडा सात टक्के प्रमाणे एकूण सहा लाख २८ हजार रुपयांचा रिबेट देण्यात आला. तसेच सर्व दूध उत्पादकांना भेटवस्तूही देण्यात आल्या. संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब वडराळे, संजय पाटील, महादेव चौगुले, काशिनाथ कुंभार, महाप्पा मरगुद्री, राजकुमार पाटील यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित होते. सचिव वीरुपाक्ष कौजलगी यांनी प्रास्ताविक केले. मलाप्पा मरगुद्री यांनी आभार मानले.