कडकनाथ पालकांना न्याय द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडकनाथ पालकांना न्याय द्या
कडकनाथ पालकांना न्याय द्या

कडकनाथ पालकांना न्याय द्या

sakal_logo
By

58288
----------------------------
कडकनाथ पालकांना न्याय द्या
संघर्ष समितीची मागणी; प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : महारयत अॅग्रो इंडियाने कडकनाथ कोंबडी पालनात घोटाळा केला. या घोटाळ्यामुळे देशोधडीला लागलेल्या कडकनाथ कोंबडी पालकांनी तीन वर्षे पाठपुरावा करूनही शासनाकडून ठोस निर्णय झालेला नाही. नव्या सरकारने तरी न्याय द्यावा, अशी मागणी कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन प्रांताधिकाऱ्यांना दिले.
महारयत अॅग्रो इंडिया या कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनात हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केली. ही बाब शासनाला निदर्शनास आणून देत दोषींवर कारवाईसाठी विविध प्रकारची आंदोलने केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नाबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यापुढे काहीच झाले नाही. शासनाकडून कोणत्याही हालचाली नसल्याने कडकनाथ कोंबडी पालकांत अस्वस्थता पसरली आहे. शासनाने योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांनी निवेदन स्वीकारले. अमृत शिंत्रे, सुदर्शन चव्हाण, आनंदा पाटील, प्रीतम कापसे, दत्तात्रय कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, सुनील पाटील, आर्यन सुतार, कलाप्पा पाटील, दत्ताराम गुरव, जानबा शिंदे, मयूर कोकितकर, पांडुरंग पाटील, भूषण सुतार, श्रेयस सुतार आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.