दिवाळी किर्दचे महत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी किर्दचे महत्व
दिवाळी किर्दचे महत्व

दिवाळी किर्दचे महत्व

sakal_logo
By

संगणकीय युगात कीर्द पूजेचा मान कायम

व्यापारी उलाढाल नोंद वह्या

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २२ ः कोट्यवधीची उलाढाल व पिढ्यान्‌पिढ्या शेतीमाल व्यवहाराचे श्रद्धास्थान बनलेल्या कीर्द यंदाच्या दिवाळीसणात लक्ष्मी व वही पूजनात मानाच्या स्थानावर आहेत. पाच पैशांपासून लाखो रुपयांच्या व्यापारी उलाढालीत व्यापाऱ्यांचा जणू पर्यायी मेंदू म्हणून कीर्दचे महत्त्व आजही आहे.
जिल्ह्यातील विविध बाजारपेठेतील कोट्यवधींची उलाढाल नोंदी कीर्दने पिढ्यान्‌पिढ्या जपली. वाडवडिलांच्या कीर्दीतील नोंदीवर पुढे व्यवहार करीत बडे व्यापारी झाले. त्या कीर्द आजही अनेकांच्या पेढीवर आहेत. तशा कीर्दीतील नोंदीत साक्षी पुरावा म्हणून पूर्वी सादर होत.
व्यापारासाठी उत्तर भारतातील गुजराती, राजस्थानी वर्ग महाराष्‍ट्रात आला. त्याला शंभर वर्षे झाली. व्यवसायाच्या गडबडीत पैशांचे देणे-घेणे विसरून व्यवहारात गडबड होऊ नये. आपले अथवा ग्राहकांचे नुकसान होऊ नये. यासाठी व्यवहार लिहून ठेवण्याची प्रथा व्यापाऱ्यांनी आणली, असा व्यापार ज्या वहीत लिहिला जातो. अशा कीर्दला आजही मान आहे.
गूळ व्यापारी निमेश वेद यांनी कीर्द नोंदीविषयी दिलेली माहिती अशी, लाल कापडी कव्हर जाड वही, त्याला रेषा नसतात, सरळ पाने असतात. ३०० ते ५०० पानांची जाड वही असते. त्यावर पहिल्या दोन घड्यात तारीख-वार पुढेच्या सात रकान्यात शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, शेतीमाल, सौदा, बाजारातील भाव, वजन पैसे दिल्या घेतल्याच्या नोंदी दिवाणजी लिहितात. संध्याकाळी मालक लोक या नोंद वही तपासून हिशेबाचा मेळ घेत होते. यातून कोणाला किती रक्कम दिली. किती द्यायची आहे, हे समजून येत होते. व्यवहार पारदर्शक असल्याने शेतकरी ग्राहक व्यापारी यांचे नाते विश्वासाचे आहे. त्याचे कीर्द हे महत्त्वाचे साधन व श्रध्देचे प्रतीक आहे. त्याची पूजा वहीपूजन करून होते.
..........

कीर्दचे प्रकार असे
रोकड वही, जमा वही, नावे वही, माप वही, खाते वही, आवक जावक माल वही, धनादेश वही, बाजार वही, खरेदी वही, विक्री वही अशा गरजेनुसार ७ ते १६ प्रकारच्या विविध नोंद वह्या कीर्द वापरात होत्या. अशा कीर्दची बांधणी करणारे कोल्हापूर शहरात मोजकेच बाईंडर आहेत.