दीपोत्सवात उजळले शहर आज लक्ष्मीपुजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीपोत्सवात
उजळले शहर
आज लक्ष्मीपुजन
दीपोत्सवात उजळले शहर आज लक्ष्मीपुजन

दीपोत्सवात उजळले शहर आज लक्ष्मीपुजन

sakal_logo
By

फोटोओळीत लाडवाडी (कोल्हापूर) असे करणे...
----------------------------------------

दीपोत्सवात
उजळले शहर
---
आज लक्ष्मीपूजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः आनंद, तेज आणि स्नेहाचे प्रतीक असलेल्या दिवाळीच्या आनंदपर्वास लखलखत्या वातावरणात प्रारंभ झाला आहे. आज पूर्वसंध्येला आकाशकंदील, पणत्या, रोषणाईने सारे शहर उजळून निघाले होते. रांगोळीने अंगण, रस्ते सजले होते. आयुष्यातील व्यथा, अडचणी क्षणभर बाजूला ठेवून सारे दिवाळीच्या स्वागतासाठी दंग झाले. वसूबारसपासून दीपोत्सवाला सुरुवात झाली असली, तरी उद्या (ता. २४) नरक चतुर्दशी आहे. दिवाळीच्या अभ्यंगस्नानाचा आज मुख्य दिवस असून, बुधवारी (ता. २६) बलिप्रतिपदा अर्थात पाडवा आणि भाऊबीज आहे. त्यानिमित्त आज खरेदीसाठी झालेल्या गर्दीने शहरातील प्रमुख रस्त्यांना अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले.
प्रत्येक घर, फ्लॅट, दुकाने आणि कार्यालयांची प्रवेशद्वारे आकाशदिवे आणि एलईडी बल्बच्या माळांनी उजळली. त्यामुळे सर्व परिसर रोषणाईने भारून गेला. भेटवस्तू म्हणून देण्यासाठी सुक्यामेव्याच्या स्टॉलवर गर्दी दिसत होती. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या उक्तीची प्रचीती आजच्या वातावरणातून येत होती. उरल्यासुरल्या खरेदीसाठी महाद्वार रोडसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर गर्दीच गर्दी होती. विशेषतः सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानांत मोठी गर्दी होती. दरम्यान, उपनगरांतही दिवाळीची धांदल दिसत होती. रस्त्याकडेला असलेल्या झोपडपट्ट्या, बंगल्यांतूनही सप्तरंगाची उधळण करणारा आकाशकंदील दिवाळीचा आनंद द्विगुणित करीत होता. अंगणातील स्वच्छता करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत उपनगरे जागी होती.

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
सोमवारी ः दिवाळीचा मुख्य दिवस, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजन
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त ः सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटांपासून रात्री ८.३८ पर्यंत.
रात्री १०.४९ ते रात्री १२.२३ पर्यंत, तसेच उत्तर रात्री १.५६ ते मंगळवारी पहाटे ५.०४ पर्यंत
बुधवारी ः दिवाळी पाडवा, भाऊबीज
पाडवा वहीपूजन मुहूर्त ः सूर्योदयापासून सकाळी साडेनऊपर्यंत
सकाळी १० वाजून ५६ मिनिटांपासून दुपारी १२.२२ पर्यंत