प्रोत्साहनात्मक अनुदानातून कर्ज वसूल केल्यास कारवाई सहकारमंत्री अतुल सावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रोत्साहनात्मक अनुदानातून 
कर्ज वसूल केल्यास कारवाई
सहकारमंत्री अतुल सावे
प्रोत्साहनात्मक अनुदानातून कर्ज वसूल केल्यास कारवाई सहकारमंत्री अतुल सावे

प्रोत्साहनात्मक अनुदानातून कर्ज वसूल केल्यास कारवाई सहकारमंत्री अतुल सावे

sakal_logo
By

प्रोत्साहनात्मक अनुदानातून
कर्ज वसूल केल्यास कारवाई
---
सहकारमंत्री अतुल सावे यांचा इशारा
कोल्हापूर, ता. २३ : राज्य शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना दिलेल्या प्रोत्साहनात्मक अनुदानातून कर्जाची वसुली करणाऱ्या सहकारी सेवा संस्थांवर कारवाई केली जाईल. कोणत्याही संस्था व बॅंकांनी अशी चुकीच्या पद्धतीने वसुली करू नये, असा इशारा राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना दिला.
कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख २९ हजार ६०२ खातेदारांना ४०९ कोटींची प्रोत्साहनात्मक रक्कम मिळाली आहे. मात्र, गावपातळीवर सहकारी सेवा संस्था, राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेतून यंदाची कर्जवसुली करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या आनंदावर पाणी फेरले आहे. याबाबत आज ‘सकाळ’मधून प्रसिद्ध झालेल्या ‘प्रोत्साहन रकमेतून कर्जाची वसुली’ या वृत्ताची दखल घेत सहकारमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला.
सावे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून दिलेल्या रकमेतून कर्जवसुली करता येणार नाही. ज्या शेतकऱ्यांकडून अशी रक्कम वसूल केली आहे, त्या शेतकऱ्यांची तक्रार आल्यावर संबंधित संस्थेवर कारवाई केली जाईल. जिल्हा प्रशासन व जिल्हा उपनिबंधकांकडूनही याबाबत कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.’’ दरम्यान, सहकारमंत्र्यांनी दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करून त्यांना यंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी पाठबळ द्यावे, अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.