पत्रके न्यूज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रके न्यूज
पत्रके न्यूज

पत्रके न्यूज

sakal_logo
By

ई.पी.एस.९५ पेन्शनरांचे
सात डिसेंबरला आंदोलन
कोल्हापूर : गेली १० वर्षे देशभरातील ई.पी.एस. पेन्शनर पेन्शन वाढीसाठी आंदोलन करीत आहेत; परंतु अद्यापही केंद्र सरकार पेन्शनवाढ करत नसल्यामुळे देशभरातील चार संघटनांनी एकत्र येऊन दिल्ली येथे ७ आणि ८ डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील पेन्शनरांनी सहभागी व्हायचे आहे. जे पेन्शनर जाण्यास इच्छुक असतील त्यांनी दिल्लीला पोहोचण्याच्या तारखेच्या अगोदर दोन ते तीन दिवसांचे आणि परतीचे रेल्वेच्या तिकिटाचे आरक्षण आपल्या सोयीनुसार त्वरित करावे, असे आवाहन आप्पा कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
---------------------
‘भविष्य निधी’तर्फे रविवारी स्वच्छता अभियान
कोल्हापूर : कर्मचारी भविष्य निधी संघटन, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूरतर्फे रविवारी (ता. ३०) स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार क्षेत्रीय भविष्य निधि संघटनेच्या विविध कार्यालयांत संपूर्ण देशभर स्वच्छता अभियान ऑक्टोबर महिन्यात राबविण्यात येत आहे. या अभियानात संपूर्ण कार्यालयाचा परिसर स्वच्छ सुंदर ठेवणे. तसेच कार्यामधील विविध विभागांतील फाईल, कागदपत्रे, रेकॉर्ड, फर्निचर निटनेटके ठेवून अनावश्यक रेकॉर्ड काढून टाकणे. यासंबंधी कामे कार्यालयाचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त बीरेंद्रकुमार यांच्या मार्गदर्शना सुरू केलेली आहेत.
------------------
आरायंत्रे फर्निचर
उद्योजक संघातर्फे मेळावा
कोल्हापूर : राज्य सुतार लोहार छोटी आरायंत्रे फर्निचर उद्योजक संघातर्फे बोंद्रेनगरमधील श्री जोतिबा मंदिर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांचा मेळावा झाला. मेळाव्यामध्ये बांधकाम कामगार नोंदणी पूर्ण झालेल्यांना सुरक्षा संचाचे वाटप शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) सुजित चव्हाण यांच्या हस्ते झाले. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यातर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कामगारांना दीपावली बोनस देण्याबाबत मागणी केली होती. तसेच अन्य मागण्यांबाबत मेळाव्यात चर्चा झाली. संघटनेचे अध्यक्ष आनंदा सुतार यांनी संघटनेच्या कामकाजाची माहिती दिली. तानाजी इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम शिपुगडे, आनंदा पवळ, शिवाजीराव जाधव, प्रसाद चव्हाण, संजय सावंत, सुनील घोडके, सोमनाथ सुतार, नामदेव सुतार, संजय सुतार, वसंत सुतार, धनाजी सुतार, प्रकाश सुतार, महेश सुतार, पुंडलिक पाटील, नवनाथ पाटील, शुभम पिलावरे, तानाजी पिलावरे तसेच बांधकाम कामगार उपस्थित होते.