टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचे पुढे काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचे पुढे काय?
टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचे पुढे काय?

टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचे पुढे काय?

sakal_logo
By

टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचे पुढे काय?

पगार, वेतनवाढीबाबत संभ्रम

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापर, ता. २४ : राज्यात गाजत असलेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यातील शिक्षकांचे पुढे काय, असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. या घोटाळ्यात जिल्‍ह्यातील २२ शिक्षकांचा समावेश आहे. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. याप्रकरणी संबंधित शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या शिक्षकांचे वेतन, तसेच वेतनवाढ न देण्याबाबत आदेशही आले आहेत. तसेच काहींनी परीक्षा दिली नसताना त्यांना टीईटी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे या परीक्षेत मोठा गोंधळ असल्याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

जिल्‍ह्यातील २२ शिक्षकांची टीईटी घोटाळ्यात चौकशी सुरू आहे. मात्र, प्रकरण न्यायालयात असताना त्यांची जिल्‍ह्यात चौकशी करण्याचे कारण काय, अशी विचारणा होत आहे. याप्रकरणी सारवासारव सुरू असल्याचे चित्र आहे. कागदपत्रे पडताळणीसाठी संबंधित शिक्षकांना बोलवले असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप तरी या शिक्षकांना सेवेतून काढण्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. तसेच त्यांचे नियमित वेतनही थांबवू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, हे आदेश देत असताना या शिक्षकांना वेतनवाढ न देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.