किल्ले बनविण्यासाठी बालचमूंची लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ले बनविण्यासाठी बालचमूंची लगबग
किल्ले बनविण्यासाठी बालचमूंची लगबग

किल्ले बनविण्यासाठी बालचमूंची लगबग

sakal_logo
By

किल्ले बनविण्यासाठी बालचमूंची लगबग
शिरोली दुमाला ः शाळांना दिवाळीची सुटी असल्याने ग्रामीण भागात गलोगल्लीत बालचमू एकत्र येऊन किल्ला बांधण्यात मग्न आहेत. दिवाळी सण म्हणजे दिव्यांचा लखलखता प्रकाश, फराळाची रेलचेल आणि मुख्य म्हणजे बालचमूंना गडकिल्ल्यांवरील असलेल्या प्रेमातून गडकिल्ले साकारण्याची संधी मिळते. काही ठिकाणी किल्ला स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यामुळे प्रतापगड, सिंहगड, रायगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारख्या किल्ल्यांच्या प्रतिकृती हुबेहूब करण्यासाठी दगड, विटा व माती या साहित्यापासून किल्ले, गड बनवित आहेत. असे असले तरी अलीकडे रेडीमेड प्लास्टर ऑफ पॅरिसचे विविध रंग, आकाराचे किल्ले बाजारात विक्रीसाठी आले आहेत. त्यामध्ये भालदार, चोपदारसह मावळे, प्राणी, पशू-पक्ष्यांच्या मूर्तीही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.