सुषमा पोवार यांना ग्रंथपाल पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुषमा पोवार यांना ग्रंथपाल पुरस्कार प्रदान
सुषमा पोवार यांना ग्रंथपाल पुरस्कार प्रदान

सुषमा पोवार यांना ग्रंथपाल पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

58499
----------------------------
सुषमा पोवार यांना
ग्रंथपाल पुरस्कार प्रदान
गडहिंग्लज : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील अक्षर भारत वाचनालयाच्या ग्रंथपाल सुषमा पोवार यांना कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचा आदर्श ग्रंथपाल पुरस्कार मिळाला. जिल्हा ग्रंथालय संघाचे ५३ वे अधिवेशन कोल्हापूर येथे झाले. यात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सौ. पोवार यांना हा पुरस्कार प्रदान केला. राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, माजी अध्यक्ष गंगाधर पटणे, राज्याचे ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, निरीक्षक उत्तम कारंडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तानाजी मगदूम आदी उपस्थित होते.