‘कोष्टी समाज’तर्फे विद्यार्थिनींचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कोष्टी समाज’तर्फे विद्यार्थिनींचा सत्कार
‘कोष्टी समाज’तर्फे विद्यार्थिनींचा सत्कार

‘कोष्टी समाज’तर्फे विद्यार्थिनींचा सत्कार

sakal_logo
By

58651
------------
‘कोष्टी समाज’तर्फे विद्यार्थिनींचा सत्कार
इचलकरंजी : हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील लिंगायत हटकर कोष्टी समाज संघटनेचा चौथा वर्धापन दिन साजरा केला. बनशंकरी देवी व आद्य वचनकार देवरदासी मैय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रसाद वाटप केला. अध्यक्षस्थानी गुरुमूर्ती म्हेत्री (गुरय्या स्वामी) होते. नूतन जिल्हाध्यक्ष, जिल्हा कमिटी व एनएमएमएस शिष्यवृत्ती मिळवल्याबद्दल विद्यार्थिनी उत्कर्षा गड्डे, विद्या ईक्कळकी, ऋतुजा दसरे यांचा सत्कार केला. लोकमंगल मल्टिस्टेटचे संचालक शीतल शहाणे, समाजाचे जिल्हाध्यक्ष इराण्णा सिंहासने, नूतन संचालक रजनीकांत लठ्ठे, शिवाप्पा मेत्री, कैलास म्हेत्तर, नीलेश लोणी, संगमनगरचे अध्यक्ष बंडोपंत बिरंगे, शिवलिंग मेत्री, सुनील वस्त्रे, नरेश धंदले, परमेश्वर इक्कळकी, रामप्रसाद करडे, संजय भाकरे उपस्थित होते.