जयंती नाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयंती नाला
जयंती नाला

जयंती नाला

sakal_logo
By

58683

ओसंडणारे सांडपाणी रोखा
महापालिकेचे विश्‍वा इन्फ्राला आदेश; आजपासून होणार परिणाम

कोल्हापूर, ता. २५ ः पाऊस संपला तरी जयंती नाल्यातून सांडपाणी ओसंडून वाहून थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. त्यामुळे तिथून जादा उपसा करून ओसंडून वाहणारे सांडपाणी रोखण्याचे आदेश विश्‍वा इन्‍फ्रा कंपनीला आज महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने दिले. गेल्या काही दिवसांपासून नाला ओसंडून वाहत आहे.
जयंती नाल्याच्या बंधाऱ्यावर सांडपाणी अडवून संप व पंप हाउसमधून उपसा केला जातो. उपसलेले पाणी कसबा बावडा येथील ७६ एमएलडी क्षमतेच्या प्रक्रिया प्रकल्पाकडे नेले जाते. ही जबाबदारी प्रकल्प राबवणाऱ्या विश्‍वा इन्फ्रा कंपनीची आहे. गेल्या आठवड्यात पावसामुळे जादा पाणी नाल्यात आले. पाऊस कमी झाला तरी सांडपाणी ओसंडून वाहतच आहे. याबाबत आज वृत्त प्रसिद्ध होताच महापालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी केली. त्यानंतर नाल्यामध्ये अजूनही पावसाच्या पाण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचीही पाहणी केली असता सध्या ७६ एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पात ६७ एमएलडीपर्यंत पाणी घेतले जात आहे. त्यामुळे कंपनीला जादा पाणी उपसण्याची सूचना करण्याबरोबरच तातडीने ओसंडून वाहणारे सांडपाणी रोखण्याचे आदेश दिले. या कालावधीत पाऊस झाला नाही, तर उद्यापासूनच वाहणारे सांडपाणी थांबेल.