आज अपुरे पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज अपुरे पाणी
आज अपुरे पाणी

आज अपुरे पाणी

sakal_logo
By

सी व डी वॉर्डमध्ये
आज अपुरा पाणीपुरवठा

कोल्हापूर, ता. २५ ः शहरातील काही भागांतील पाणीपुरवठा रुळावर येण्यास सुरुवात झाली असताना आज बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील पंप नादुरुस्त झाला. त्यामुळे सी, डी वॉर्डमधील काही भागात आज सायंकाळी पाणीपुरवठा झाला नाही. उद्याही (ता. २६) काही ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. शहरातील पाणीपुरवठ्याची विघ्ने दूर होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत.
पुईखडी, चंबुखडी, बालिंगा येथील पाणीपुरवठ्याच्या केंद्रांमध्ये गेल्या महिन्यापासून काही ना काही विघ्ने येत आहेत. कधी मशिनरीची, तर व्हॉल्व्हची नादुरुस्ती तर कधी महावितरणच्या समस्यांमुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहेत. विविध भागांत अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न अधूनमधून डोके वर काढत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून दक्षिणेकडील उपनगरात, तसेच काही मध्यवस्तीत प्रश्‍न निर्माण झाला होता. आज टप्प्याटप्प्याने कमी होण्यास सुरुवात झाली होती. त्यातच दुपारी बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील तीन पंपांपैकी एक पंप बंद पडला. तातडीने तो दुरुस्त करण्यास सुरुवात केली. रात्री नऊच्या सुमारास पंप दुरूस्त करून सुरू करण्यात आला. मात्र सायंकाळपासून ज्या भागात पाणी पुरवठा होतो, तेथील उंच भागात पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांना ऐन सणात पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. उद्या सी व डी वॉर्डमधील उंच भागात अपुरा पाणीपुरवठा होईल.