कचरा उठाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा उठाव
कचरा उठाव

कचरा उठाव

sakal_logo
By

58697

शहरातून ३५० टन कचरा उठाव
कोल्हापूर, ता. २५ ः जोडून आलेल्या सुट्यांमुळे बहुतांश नोकरदार दिवाळीचा आनंद लुटत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील १९०० सफाई व झाडू कामगार रस्त्यावर कचरा उठाव करत आहेत. रविवारी सर्व कर्मचारी कामावर होते. तसेच, सोमवारी सुटी असतानाही काही कर्मचारी कचरा उठाव करत होते. आज ३५० टन कचरा उठाव केला.
रविवारपासून दिवाळी सुरू झाली. लक्ष्मीपूजनसाठीचे साहित्य खरेदीसाठी सोमवारी बाजारात गर्दी झाली होती. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले गेले. तसेच, विविध साहित्य खरेदीसाठी शनिवारीही मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे ठिकठिकाणी कचरा वाढला होता. पाडव्यानिमित्त उद्याही (ता. २६) फटाके वाजवण्यात येतात. त्यामुळेही कचरा होणार आहे. या बाबी विचारात घेऊन आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशीही कामावर बोलवले होते. टिपरद्वारे घराघरांतून कचरा संकलन केले जात आहेच. शिवाय बाजारपेठांमध्ये साठलेला कचराही जमा केला जात होता. त्यासाठी कर्मचाऱ्यांबरोबरच स्वतंत्र ट्रॅक्टर, दोन डंपर तसेच जेसीबी कार्यरत होते.