पालकमंत्री अंबाबाई मंदिर, जयप्रभा स्टुडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री अंबाबाई मंदिर, जयप्रभा स्टुडिओ
पालकमंत्री अंबाबाई मंदिर, जयप्रभा स्टुडिओ

पालकमंत्री अंबाबाई मंदिर, जयप्रभा स्टुडिओ

sakal_logo
By

58715
............

अंबाबाई मंदिर परिसरातील
प्रलंबित कामांबाबत लवकरच निर्णय

पालकमंत्री केसरकर यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः शहर पर्यटन विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अंबाबाई मंदिर, जुना राजवाडा, मेन राजाराम हायस्कूलसह शेतकरी सहकारी संघ इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.
अंबाबाई भाविकांसाठी दर्शन मंडपाची सुविधा, अन्नछत्र, यात्री निवास, स्वच्छतागृहांची उभारणी आदी विविध कामांबाबत येत्या तीन महिन्यांत आढावा घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. दर्शन मंडपासाठी शेतकरी संघाची इमारत देवस्थान समितीला मिळावी, अशी मागणी यावेळी देवस्थान समितीच्या वतीने केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे आदी उपस्थित होते.
...............