दिवाळी पाडवा आज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी पाडवा आज
दिवाळी पाडवा आज

दिवाळी पाडवा आज

sakal_logo
By

दिवाळी पाडव्यानिमित्त
आज रंगणार खरेदीचा उत्सव

भाऊबीजेच्या निमित्ताने सहकुटुंब आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर उद्या (बुधवारी) कोल्हापूरकरांचा खरेदीचा उत्सव रंगणार आहे. यंदा सोन्या-चांदीसह इलेक्ट्रिक वाहने, रिअल इस्टेटसह इलेक्ट्रॉनिक शोरूममध्येही खरेदीसाठी झुंबड उडणार आहे.
गेल्या तीन वर्षांत कोरोनासह अन्य कारणांवरून थंडावलेली बाजारपेठेत आता पुन्हा एकदा खरेदीला उधाण आले आहे. दसऱ्यापासूनच बाजारपेठेत सळसळता उत्साह असून दिवाळीच्या निमित्ताने त्याला आणखीन उधाण आले आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणून होणाऱ्या खरेदीची साहजिकच मोठी उलाढाल होणार आहे. त्यासाठी विविध कंपन्या, शोरूम्सनी ऑफर्स जाहीर केल्या असून त्यालाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे. पाडवा आणि भाऊबीज यंदा एकाच दिवशी आल्याने सहकुटुंब आनंदोत्सव साजरा होणार आहे. गुंतवणुकीचेही अनेक पर्याय आता उपलब्ध झाले असून मुहूर्तावर गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. दुपारपर्यंत भाऊबीजेच्या निमित्ताने सहभोजन आणि सायंकाळनंतर सहकुटुंब खरेदी असा माहोल सर्वत्र अनुभवायला मिळणार आहे.