पाडव्याच्या उलाढालीला कोटीची उड्डाणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाडव्याच्या उलाढालीला कोटीची उड्डाणे
पाडव्याच्या उलाढालीला कोटीची उड्डाणे

पाडव्याच्या उलाढालीला कोटीची उड्डाणे

sakal_logo
By

58819

बाजारात कोटीची उड्डाणे
सोन्‍याचांदीला झळाळी; इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह मोबाइल, मोटारींना मागणी

कोल्हापूर, ता. २७ ः पाडव्याच्या मुहूर्तावर जिल्ह्याच्या बाजारपेठेत उलाढालीची कोटीची उड्डाणे दिसली. सोन्या-चांदीसह वाहनांना ग्राहकांनी अधिक पसंती दिली. रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशिन, एलईडी, मोबाइल हॅण्डसेट अशा इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंनाही मोठी मागणी होती. फ्लॅट बुकिंचाही टक्का यावर्षी वाढल्याचे दिसले. जिल्ह्यातील बाजार पेठेत हजार कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. दीपावली आणि पाडव्याच्या मुहूर्तावर प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) ........दुचाकीचे तर..... चार चाकींची नोंदणी झाली.
सोन्या-चांदीचा स्थिर असलेला दर, गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय, लग्नसराईची खरेदी मुहूर्तावर अशा वेगवेगळ्या कारणामुळे या पाडव्याला सोन्या-चांदीची उलाढाल मोठी झाली. सराफ कट्ट्यासह शोरूममध्ये उभे राहण्यासाठी जागा नव्हती, असा प्रतिसाद ग्राहकांनी दिला. एक ग्रॅमपासून ते पाच तोळ्यांपर्यंतची खरेदी होत होती, तर हिऱ्यासह कर्णफुले जुन्याचे नवे, प्युअर २४ कॅरेट सोन्याकडे ग्राहकांचा अधिक कल राहिल्याचे सराफांकडून सांगण्यात आले. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५२ हजार होता, तर एक किलो चांदीचा दर ५८ हजार ५०० होता. हा दर दीड हजार रुपयांना उतरल्याचेही सराफ कुलदीप गायकवाड यांनी सांगितले. व्हिनस कॉर्नर, गुजरी, राजारामपुरी आदी ठिकाणी सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी गर्दी होती. रात्री उशिरापर्यंत शोरूममध्ये ग्राहक रांगेत उभे राहून खरेदी केली जात होती.
दुचाकी-चार चाकी वाहन खरेदीसाठीही यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. एका एका शोरूममधून सुमारे दोन-अडीचशे मोटारींची विक्री झाली आहे. तीस ते पन्नास कोटींपर्यंत याची उलाढाल पोहोचली. पाडव्याच्या मुहूर्तावर ‘डिलिव्हरी’ देण्यासोबतच ‘बुकिंग’साठीही अनेक ग्राहकांनी मुहूर्त साधला. मोटारी खरेदीसाठी रजिस्ट्रेशन होणे आवश्‍यक असल्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तासाठी विक्रेत्यांनी चार दिवसांपूर्वीची तयारी केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुहूर्तावर डिलिव्हरी देण्यात विक्रेत्यांना यश आल्याचे साई सर्व्हिसचे सुधर्म वाझे यांनी सांगितले.
--
इलेक्ट्रिक वाहनांचीही मागणी वाढली
एक्स्चेंज ऑफरलाही ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाला. तसेच भरघोस डिस्काऊंटमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. इलेक्ट्रिक वाहनांचीही मागणी वाढली असून, अनेक ग्राहकांना पाडव्याच्या मुहूर्तावर गाड्या मिळाल्या नसल्याचे सांगण्यात आले.
-
कोट
गतवर्षीपेक्षा यावर्षी सोन्या-चांदीसह, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहनांची बाजारपेठेत अधिक उलाढाल झाली. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांचा अंदाज घेतला तर सुमारे हजार कोटींहून अधिक उलाढाल झाली. यामध्ये फ्लॅट बुकिंगही मोठ्या प्रमाणात झाले. सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी रीघ लागली होती.
-संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स