पाणी कमी दाबानेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी कमी दाबानेच
पाणी कमी दाबानेच

पाणी कमी दाबानेच

sakal_logo
By

मध्य वस्तीतील अनेक भागांत
कमी दाबाने पाणीपुरवठा

कोल्हापूर, ता. २७ ः बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील बंद पडलेल्या एका पंपामुळे दिवाळी पाडव्यादिवशी (ता. २६) सी व डी वॉर्डमधील अनेक भागांत कमी दाबाने पाणी आले. त्यामुळे ऐन सणात प्रामुख्याने महिलांची पाण्यासाठी तारांबळ उडाली. गुरुवारपासून (ता. २७) मात्र अनेक भागांत सुरळीत पाणीपुरवठा झाला.
गेल्या आठवड्यापासून कोणत्या ना कोणत्या भागात अपुरा तसेच गढूळ पाणीपुरवठा होत होता. त्याबाबत महापालिकेकडे नागरिकांनी तक्रारीही केल्या होत्या. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने टप्प्याटप्प्याने समस्या कमी करत आणल्या होत्या. मंगळवारी मात्र दुपारी बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील एक पंप बंद पडला. इतर पंप सुरू असले तरी टाकीतील अपेक्षित पाणी पातळी गाठली नाही, तर अनेक भागांत कमी दाबाने, तर उंचावरील भागात पाणीच येत नाही. पंप दुरुस्तीचे काम सुरू केले तरी दुपारपासून रात्री नऊ वाजेपर्यंत पाणी कमी उपसा झाले. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी सी, डी वॉर्डमधील अनेक भागांत कमी दाबाने, तर काही ठिकाणी पाणी आले नाही. रात्री पंप दुरुस्त झाल्यानंतर पाणी उपसा सुरू झाला. बुधवारी व्यवस्थित पाणी मिळेल असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले होते; पण अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी आले. दिवाळी पाडवा व भाऊबीज एकाच दिवशी असल्याने घरांमध्ये लगबग होती. त्यात पाणी कमी आल्याने महिलांची धावपळ उडाली. सी, डी वॉर्डमध्ये बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ या भागांत कमी दाबाने पाणी आले. शुक्रवारपासून व्यवस्थित पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.