पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

विजेचा धक्का लागल्याने
तरुण पडून जखमी

कोल्हापूर ः आकाशकंदील लावताना विजेचा धक्का लागल्याने पहिल्या मजल्यावरून पडून तरुण जखमी झाला. ज्ञानेश्वर रामराव सातपुते (वय ३०, रा. परभणी, गंगाखेड, सध्या रा. गांधीनगर) असे जखमींचे नाव आहे. मंगळवारी (ता.२५) सायंकाळी ही घटना घडली. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.
-----------
मारहाणीत महिला गंभीर
कोल्हापूर ः राहत्या घरी पतीने लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. राधिका गवळी (वय ३०, रा. बापट कँप) असे जखमींचे नाव आहे. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, की संशयित पती अवचित गवळी याने संशयातून बापट कँम्प येथील राहत्या घरात पत्नी राधिका यांना आज सकाळी लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. अशी फिर्याद जखमी राधिका गवळी यांच्या माहेरच्यांनी दिली. त्यानुसार संशयित अवचित याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक इश्वर ओमासे यांनी भेट दिली. अधिक तपास उपनिरीक्षक सुनिता शेळके करीत आहेत.
-------------
अपघातात तरुण जखमी
कोल्हापूर ः जवाहनगर चौकात येथे बुधवारी (ता.२६) रात्री झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. राकेश गणेश कोकाटे (वय २७, रा. गोकुळ शिरगाव) असे जखमींचे नाव आहे.
----------------
मारहाणीत तिघे जखमी
कोल्हापूर ः फुलेवाडी रिंगरोड येथे बुधवारी (ता.२६) रात्री झालेल्या मारहाणीत मुंबईतील तिघे जण जखमी झाले. चैतन्य कोकरे, प्रकाश कोकरे, कोंडीबाई कोकरे अशी जखमींची नावे आहेत. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.
--------------------
गळफास घेतलेल्या महिलेचा मृत्यू
कोल्हापूर ः राहत्या घरी लोखंडी पाईपला साडीने गळफास घेतलेल्या महिलेचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. प्रेमा रामचंद्र माडीमगिरी (वय २०) असे त्यांचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता.२५) रात्री घडली होती. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.
----------------