गोडसाखर थेट लढाई सुधारीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोडसाखर थेट लढाई सुधारीत
गोडसाखर थेट लढाई सुधारीत

गोडसाखर थेट लढाई सुधारीत

sakal_logo
By

‘गोडसाखर''साठी थेट लढाई
गडहिंग्लज, ता. २७ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना निवडणुकीत 19 जागांसाठी 43 उमेदवार रिंगणात आहेत. आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, अप्पी पाटील, संग्राम कुपेकर, राजेंद्र गड्ड्यान्नावर यांच्या छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडी विरुद्ध आमदार राजेश पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, संग्रामसिंह नलवडे व शिवाजी खोत यांची शेतकरी, कामगार विकास आघाडीत सत्तेसाठी रस्सीखेच होणार आहे. माघारीची अंतिम वेळ जवळ आल्यानंतरच आघाड्या स्पष्ट होण्याची परंपरा कायम राहिली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप, सहायक अधिकारी अमित गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली माघारीची प्रक्रिया पार पडली.