अतिक्रमणसाठी पाठपुरावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमणसाठी पाठपुरावा
अतिक्रमणसाठी पाठपुरावा

अतिक्रमणसाठी पाठपुरावा

sakal_logo
By

अतिक्रमणविरोधी
कृती समितीकडून निषेध

कोल्हापूर, ता. २८ ः अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला सोमवारी भेटा, असे सांगत चर्चा न करता नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन निघून गेल्याने समितीने निषेध केला.
खुल्या जागांवरील अतिक्रमणे, बेकायदा पार्किंगवरील कारवाईबाबत आठ दिवसांचा अवधी समितीने दिला होता. त्यानंतर समितीने महाजन यांची भेट घेतली. मात्र, ते चर्चा न करता कार्यालयातून निघून गेले. या वागणुकीबद्दल कार्यालयाबाहेर मौन धारण करत कृती समितीने महाजन यांचा निषेध नोंदवला. त्यानंतर समिती सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याशी संपर्क साधला. महाजन यांच्याशी फोनवरून चर्चा करून तक्रारींवर तोडगा काढण्याची सूचना केली. त्यावेळी सोमवारी वेळ दिली असल्याचे महाजन यांनी सांगितले. यावेळी निमंत्रक फिरोज शेख, प्रा. नीलिमा व्हटकर, चित्रा नार्वेकर, मालती शिंदे, अंकुश कदम, ॲड. निर्मला कुंभार आदी उपस्थित होते.