गोडसाखर निवडणूक माघार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोडसाखर निवडणूक माघार
गोडसाखर निवडणूक माघार

गोडसाखर निवडणूक माघार

sakal_logo
By

शिंदेंसह ८ माजी संचालक रिंगणाबाहेर
गोडसाखर निवडणूक : दहा माजी संचालक पुन्हा नशीब आजमावणार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत आठ माजी संचालक रिंगणाबाहेर आहेत. त्यात माजी अध्यक्ष व माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांची माघार अनपेक्षित मानली जात आहे. दहा माजी संचालक पुन्हा नशीब आजमावणार असून ही निवडणूक दुरंगी होत आहे. १९ जागांसाठी ४३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यामध्ये पाच अपक्षांचा समावेश आहे.
अ‍ॅड. शिंदे यांच्यासह दीपकराव जाधव, सुभाष शिंदे, जयश्री पाटील, किरण पाटील, अनंत कुलकर्णी, क्रांतीदेवी कुराडे, बाळासाहेब मोरे हे माजी संचालक रिंगणात नाहीत. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, संग्रामसिंह नलवडे, सतीश पाटील, अमर चव्हाण, विद्याधर गुरबे, सदानंद हत्तरकी, प्रकाश पताडे, बाळकृष्ण परीट, संभाजी नाईक हे दहा जण पुन्हा निवडणूक लढवित आहेत. दरम्यान, क्रांतीदेवी कुराडे यांच्या ऐवजी त्यांचे चिरंजिव दिग्विजय तर बाळासाहेब मोरे यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र विजय मोरे हे पहिल्यांदाच कारखाना निवडणुकीला सामोरे जात आहेत.
आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. शहापूरकर यांच्यासह प्रकाश चव्हाण, अप्पी पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यान्नावर, सदानंद हत्तरकी गट, काँग्रेसचे विद्याधर गुरबे, शिवसेनेचे संग्राम कुपेकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडी आकाराला आली आहे. त्या विरोधात आमदार राजेश पाटील, जनता दलाचे नेते श्रीपतराव शिंदे, काँग्रेसचे संग्रामसिंह नलवडे, सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी-कामगार विकास आघाडी रिंगणात आहे. एकास एक लढतीमुळे चुरशीच्या निवडणुकीचे संकेत आहेत. भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे व प्रीतम कापसे यांच्यासह सुरेश कुराडे, उर्मिला पाटील, प्रवीण पोवार हे पाच जण अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. भाजपचे कार्यकर्ते संजय बटकडली यांनी अनपेक्षितपणे आमदार राजेश पाटील यांच्या आघाडीत दाखल झाले आहेत. शिवाजी खोत यांनी संस्था व उत्पादक गट या दोन्ही ठिकाणी नशीब आजमावत आहेत.
...........


आघाडीनिहाय रिंगणातील उमेदवार
-------------------------------------------------
*मतदारसंघ *शाहू समविचारी आघाडी *शेतकरी-कामगार आघाडी
-----------------------------------------------------------------
*कडगाव-कौलगे *प्रकाश शहापूरकर, विश्‍वनाथ स्वामी, बाळासाहेब देसाई *अशोक देसाई, विकास पाटील, सुजित देसाई
---------------------------------------------------------------
*गडहिंग्लज-हनिमनाळ *शिवराज पाटील, अशोक मेंडुले, अक्षयकुमार पाटील * संग्रामसिंह नलवडे, शिवाजी खोत, विजय मोरे
----------------------------------------------------------------
*भडगाव-मुगळी *प्रकाश चव्हाण, सतीश पाटील *अमरसिंह चव्हाण, बाबासाहेब पाटील
------------------------------------------------------------------
*नूल-नरेवाडी *रवींद्र पाटील, सदानंद हत्तरकी *रणजित यादव, वसंतराव चौगुले
------------------------------------------------------------------
*महागाव-हरळी *भरमू जाधव, प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे *बाळकृष्ण परीट, प्रदीप पाटील, संदीप शिंदे
------------------------------------------------------------------
*संस्था गट *सोमनाथ पाटील *शिवाजी खोत
------------------------------------------------------------------
*अनु. जाती *काशिनाथ कांबळे *परसू कांबळे
------------------------------------------------------------------
*महिला राखीव *कविता पाटील, मंगल आरबोळे *शुभांगी देसाई, गीता पाटील
------------------------------------------------------------------
*इतर मागास *दिग्विजय कुराडे *संजय बटकडली
------------------------------------------------------------------
*भटक्या विमुक्त जाती *अरुण गवळी *संभाजी नाईक
----------------------------------------------------------------

चौकट

एकूण, माघार व शिल्लक संख्या अशी
कडगाव-कौलगे : एकूण २६ व माघार २० (शिल्लक ६), गडहिंग्लज-हनिमनाळ - ३० व २३ (७), भडगाव-मुगळी- २१ व १७ (४), नूल-नरेवाडी- २६ व २१ (५), महागाव -हरळी - २९ व २२ (७), संस्था -१२ व १० (२), अनुसूचित जाती-१३ व ११ (२), महिला राखीव - २८ व २३ (५), इतर मागास- १६ व १३ (३) तर भटक्या विमुक्त - १५ व १३ (२).