‘घाळी’मध्ये नवागतांचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘घाळी’मध्ये नवागतांचे स्वागत
‘घाळी’मध्ये नवागतांचे स्वागत

‘घाळी’मध्ये नवागतांचे स्वागत

sakal_logo
By

‘घाळी’मध्ये नवागतांचे स्वागत
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र व संख्याशास्त्र विभागातर्फे नवागत विद्याथ्यांचे स्वागत व स्टुडंट इंडक्शन प्रोग्रॅम असा संयुक्त कार्यक्रम झाला. प्रा. ए. एस. मगर यांनी स्वागत केले. विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव गजेंद्र बंदी प्रमुख पाहुणे होते. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. श्री. बंदी, डॉ. पाटील, प्रा. मिलिंद पाटील, डॉ. के. एन. पाटील, प्रा. महेश कदम यांची भाषणे झाली. परीक्षा विभाग, संशोधन विभाग, जिमखाना, सांस्कृतिक, महिला तक्रार निवारण कक्ष, अ‍ॅन्टी रॅगिंग या विभागांची माहिती दिली. प्रा. डॉ. एस. ए. मस्ती, डॉ. आर. एस. सावंत, ग्रंथपाल आर. एस. सावेकर, प्रा. ए. जी. गोडघाटे उपस्थित होते. लक्ष्मी वायदंडे, वैष्णवी कालकुंद्रीकर, मनीषा माद्याळकर, सिमरन शेटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्नेहल जाधव यांनी आभार मानले.
------------------------------------------------
ओंकारमध्ये कार्यक्रम
गडहिंग्लज : येथील ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी असोसिएशन व तिरुमला तिरुपती मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना कपडे व फराळाचे वाटप केले. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर प्रमुख पाहुणे होते. माजी विद्यार्थी शिवानंद घेजी यांच्यातर्फे आरती पाटील, सुरेखा कांबळे, अश्‍विनी सुतार, लक्ष्मी गवळी, सुनीता गोरे, वैष्णवी गोरे, तेजस खोराटे, दिपक घोलराखे, रुपेश घोलराखे, अभिषेक गगरी, बाबूराव केसरकर, अभिषेक कळंत्रे या विद्यार्थ्यांना नवे कपडे व फराळ दिला. पालक भैरु गोरे, अभिषेक पाटील, आनंदा बारड, डॉ. अनिल पाटील उपस्थित होते. डॉ. डी. जी. चिघळीकर यांनी प्रास्ताविक केले. असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कांबळे यांनी आभार मानले.
---------------------------------------------
रवळनाथमध्ये उद्या प्रशिक्षण
गडहिंग्लज : श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे रविवारी (ता. ३०) सभासद प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. संस्थेच्या येथील डॉक्टर कॉलनीतील प्रधान कार्यालयात दुपारी चार ते सात या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. बहुराज्य सहकारी संस्था कायदा २००२ नुसार सभासदांचे अधिकार, कर्तव्ये व जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. सांगलीचे डॉ. आर. जी. कुलकर्णी उद्‍घाटक असून ज्येष्ठ अर्थतज्‍ज्ञ डॉ. वसंत जुगळे बीजभाषक आहेत. मराठी विश्‍वकोष निर्मिती मंडळाचे सदस्य प्रा. संजय ठिगळे तज्‍ज्ञ मार्गदर्शक आहेत. या प्रशिक्षण कार्यशाळेत सभासदांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव व सीईओ डी. के. मायदेव यांनी केले आहे.