यिन भाऊबीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन भाऊबीज
यिन भाऊबीज

यिन भाऊबीज

sakal_logo
By

यिन लोगो
-
फोटो- 10551

‘यिन’सदस्यांनी साजरी केली
हमाल बांधवांसमवेत भाऊबीज

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : हमाल बांधवांना कधी कोणते साहित्य उचलावे लागेल, सांगता येत नाही. शारीरिक श्रम खूप झाले, असे कोणापुढे व्यक्तही होता येत नाही. गावातून कोल्हापूरला आल्यावर गावी परतणार कधी, याचाही नेम नाही. काम एके काम, हेच त्यांच्या जगण्याचे सूत्र. अशा हमाल बांधवांच्या आयुष्यात सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) सदस्यांनी आनंदाची पेरणी केली. निमित्त होते भाऊबीजेचे!
हमाल म्हटले की, कोणते काम अंगावर पडेल, हे त्यांनाच कळत नाही. मात्र, जे काम असेल ते त्यांना करावेच लागते. एखादा सण कुटुंबीयांसोबत साजरा करण्याची वेळही त्यांच्या वाट्याला कमी येते. या स्थितीत त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी यिनची तरुणाई पुढे सरसावली. विविध महाविद्यालयातील यिन सदस्य विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी सकाळीच यार्डातील स्थानकावर हजेरी लावली. कामात व्यस्त असलेल्या हमाल बांधवांना एकत्र केले. त्यांना औक्षण करत फराळ दिला आणि भाऊबीजेचा आनंद द्विगुणित केला. यिन सहायक व्यवस्थापक अवधूत गायकवाड, गोरख लेंडगे, कृष्णात चौगले, महादेव मुराळ, साताप्पा जाधव, अण्णाराय सणगुंडी यांनी संयोजन केले. तिर्था मोळे, हर्षदा कदम, तानिया मुरसल, राजलक्ष्मी कदम, शिवानी शिंदे, श्रावणी शंकरदास, मुग्धा कुलकर्णी, चेतना रांगी, स्नेहल परीट, स्वप्नाली पाटील, आदित्य ताटे यांनी उपक्रमात सहभाग घेतला.