मनपा गय करणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा गय करणार नाही
मनपा गय करणार नाही

मनपा गय करणार नाही

sakal_logo
By

58955

कसबा बावड्यातील प्रश्न मार्गी लावा
सतेज पाटील; अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवकांची बैठक

कोल्हापूर, ता. २८ ः ‘‘महापालिका निवडणूक न झाल्याने लोकप्रतिनिधी नसल्याचा परिणाम विकास कामांवर होत आहे. आठ दिवसात योग्य नियोजन करून कसबा बावड्यातील कचरा उठाव आणि इतर प्रश्न मार्गी लावा. सकाळी फेरफटका मारून या कामांची पाहणी करणार आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही,’’अशी सक्त ताकीद आमदार सतेज पाटील यांनी दिली.
कसबा बावडा परिसरातील समस्यांबाबत महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक माजी नगरसेवकांची आज श्री राम सोसायटीच्या सांस्कृतिक सभागृहात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव उपस्थित होत्या.
बैठकीत प्रभागनिहाय कर्मचारी संख्या, त्यांच्या कामाचे नियोजन याची माहिती आमदार पाटील यांनी घेतली. कर्मचारी वेळेत येत नाहीत, गटार स्वच्छता, कचरा उठाव वेळेत होत नाही अशा तक्रार नागरिकांनी केल्या. प्रभागनिहाय मुकादम, कर्मचाऱ्यांची नावे, नंबर याची यादी तयार करून ज्या-त्या प्रभागातील लोकांना द्या. आठ दिवसांत कामात सुधारणा करा. वेळेत कामावर या आणि प्रामाणिकपणे काम करा, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
आमदार ऋतुराज पाटील यांनी काही कर्मचारी कामचुकारपणा करतात, त्यांच्यावर पालिकेने कारवाई करावी. जे नागरिक स्वच्छतेबाबतीत नियम पाळत नसतील त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. आमदार जाधव यांनी शहरातील कचरा उठाव वेळेत करण्याच्या सूचना केल्या. माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी नगरसेवक अशोक जाधव, डॉ. संदीप नेजदार, माधुरी लाड, सुभाष बुचडे, श्रावण फडतारे, उपायुक्त रविकांत आडसूळ, जल अभियंता हर्षजित घाटगे आदी उपस्थित होते.