राष्ट्रवादीचे शिर्डी येथे मंथन शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीचे शिर्डी येथे मंथन शिबिर
राष्ट्रवादीचे शिर्डी येथे मंथन शिबिर

राष्ट्रवादीचे शिर्डी येथे मंथन शिबिर

sakal_logo
By

राष्ट्रवादीचे शिर्डी येथे मंथन शिबिर

हसन मुश्रीफ ः ४ व ५ नोव्हेंबरला आयोजन

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता. २८ : राष्‍ट्रवादी काँग्रेसने प्रमुख कार्यकर्त्यांसाठी ४ व ५ नोव्हेंबरला शिर्डी येथे अभ्यास शिबिराचे आयोजन केले आहे. ‘राष्‍ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ अशी या शिबिराची संकल्‍पना आहे. विद्यमान राजकीय परिस्‍थिती आणि भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी माजी आमदार के. पी. पाटील, शहर राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष आर. के. पोवार, जिल्‍हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, भैया‍ माने उपस्‍थित होते.

मुश्रीफ म्‍हणाले, ‘‘राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ या शिबिरास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यातील विविध क्षेत्रांतील विचारवंत, अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाच्या वतीने सभासद नोंदणी मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. ही मोहीम गतिमान करून ग्रामीण तसेच शहरी भागात कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे निर्माण करण्यात येत आहे. शिबिराच्या माध्यमातून या मोहिमेला चालना देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्‍थापनेस २३ वर्षे झाली असून येत्या जून महिन्यामध्ये पक्ष रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या पक्षाने आपल्या २३ वर्षांच्या वाटचालीत महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे. आज देशापुढे आणि राज्यापुढे अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना कार्यकर्त्यांची मनोभूमिका अधिक बळकट होण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्‍टीने हे शिबिर महत्त्‍व‍वपूर्ण ठरणार आहे.
.......

ए. वाय. पाटील यांची बैठकीकडे पाठ

पत्रकार परिषदेस राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्यक्ष ए.वाय.पाटील व माजी आमदार के.पी.पाटील उपस्‍थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ए.वाय.पाटील यांनी दांडी मारली. याबाबत उलटसुलट चर्चा सुरुरू होताच मुश्रीफ यांनी ए. वाय. हे सहकुटुंब पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनास गेल्याचा खुलासा केला. तसेच के.पी. व ए.वाय. यांच्यातील वाद जवळपास संपला असून लवकरच गोड बातमी देणार असल्याचे मुश्रीफ यांनी या वेळी स्‍पष्‍ट केले.