गट सचिवांचा ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गट सचिवांचा ठिय्या
गट सचिवांचा ठिय्या

गट सचिवांचा ठिय्या

sakal_logo
By

58935
.........

गटसचिवांचे ठिय्या आंदोलन

विविध मागण्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

कोल्हापूर, ता. २८ : जिल्ह्यातील सर्व सेवा संस्थांच्या सक्षमीकरणाचा निधी विनाअट मिळाला पाहिजे, संस्था सक्षमीकरणाची येणारी रक्कम संस्था सचिवांच्या पगारासाठी असा नामोउल्लेख करून मिळाली पाहिजे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा विकास सहकारी संस्था गटसचिव कर्मचारी संघटनेच्यावतीने आज करण्यात आली. आपल्या विविध मागण्यांसाठी गटसचिवांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून जिल्हा उपनिबंधकांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, सहकारी संस्था गटसचिवांच्या सेवा सवलतीबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी सहकार आयुक्तांसोबत संघटना प्रतिनिधींची बैठक घ्यावी. सचिवांच्या मागण्यांबाबत सकारात्मक अहवाल तयार करून यावर ठोस निर्णय घेतला पाहिजे. संस्था सक्षमीकरणासाठी येणारा निधी हा सर्व संस्थांना विनाअट सरसकट मिळाला पाहिजे. राज्यातील मृत सचिवांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेतले पाहिजे. जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने नियुक्त केलेल्या सचिवांचा संवर्गीकरण यंत्रणेत समावेश करावा. तसेच ताळेबंद पडताळणीची माहिती दिली नाही तर पर्यायी यंत्रणा उभी करू. राज्यातील सचिवांशिवाय माहिती संकलित केली जाईल असा व्हॉटस्‌अप संदेश पाठवून सचिवांचे अस्तित्व मोडून काढण्याचा प्रयत्न करू नये. यावेळी जिल्हा सचिव संघटना अध्यक्ष रमेश चौगुले, उपाध्यक्ष विजय शिंदे, धनाजी पाटील, जालिंदर रेडेकर, पुंडलिक खोडवे, सचिन गोटखिंडे, दत्तात्रय पाटील, गणपती बिरंजे, अनिल आबदार, संभाजी पाटील उपस्थित होते.