इचल: सराफी दुकान चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल: सराफी दुकान चोरी
इचल: सराफी दुकान चोरी

इचल: सराफी दुकान चोरी

sakal_logo
By

58980
इचलकरंजी ः विवेकानंद कॉलनी येथील सराफी दुकानातील चोरीच्या घटनेची पाहणी करताना शिवाजीनगर पोलिसांचे पथक.
(पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)
...................


इचलकरंजीत सराफी दुकानातून
ःचार लाखांचे दागिने चोरीस
इचलकरंजी, ता. २८ ः शहरातील विवेकानंद कॉलनीतील श्री मयुरेश ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व पाच हजारांची रोकड असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. परंतु, ते परिसरातच घुटमळले. ठसे तज्ज्ञांनाही बोलविण्यात आले होते.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी ः विवेकानंद कॉलनी परिसरात प्रशांत चोडणकर हे कुटुंबासह राहतात. त्यांच्या बंगल्याच्या आवारातच त्यांचे श्री मयुरेश ज्वेलर्स नामक सराफी दुकान आहे. त्यांनी काल (ता. २७) रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. आज सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी सराफी दुकानाच्या मागे असलेल्या लोखंडी दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश करीत दुकानातील ड्रॉवर उचकटले. तसेच, शोकेसमधील १७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पाच किलोपेक्षा अधिक चांदीचे दागिने व पाच हजारांची रोकड व काही ग्राहकांचे दागिने असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेला आहे. भागातील सीसीटीव्हीमध्ये दुचाकीवर तिघे चोरटे आल्याचे कैद झाले आहे. दरम्यान, दुकानातील चांदीच्या देवाच्या मूर्ती व मुखवटे यांना चोरट्यांनी हात लावला नाही; तर चोडणकर यांच्या बंगल्याच्या दरवाजांना चोरट्यांनी बाहेरून कड्या घातल्या होत्या.