ई-पॉझ मशिन बंद करा -रेशन दुकानदार मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-पॉझ मशिन बंद करा -रेशन दुकानदार मागणी
ई-पॉझ मशिन बंद करा -रेशन दुकानदार मागणी

ई-पॉझ मशिन बंद करा -रेशन दुकानदार मागणी

sakal_logo
By

58990

धान्य वाटप ऑफलाइन
करण्याची परवानगी द्या

‘स्वस्त धान्य दुकानदार’चे कवितके यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः रेशन दुकानदारांकडे असलेल्या ‘ई-पॉझ’ मशिनमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे धान्य वाटप ऑफलाइन करण्याची परवानगी मिळावी, या मागणीचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रेय कवितके यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.
कामगार नेते चंद्रकात यादव, जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करून ‘ई-पॉझ’ मशिनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगितले. तसेच त्यामुळे ग्राहकांना वेळेवर धान्य देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. स्क्रीनवर केवळ ‘प्रतीक्षा करे’ असाच संदेश दिला जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वितरण होत नाही. तसेच स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षांचे पदाधिकारी नियमित मालाचे ‘ऑफलाइन’ वाटप करण्याची मागणी करीत आहेत. मात्र जोपर्यंत पुरवठा अधिकारी लेखी आदेश देत नाहीत, तोपर्यंत हे करणे शक्य नाही. त्यामुळे ‘ई-पॉझ’ मशिन बंद करून ऑफलाइन धान्याचे वितरण करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळात गजानन हवालदार, सुनील दावणे, सुरेश पाटील, पांडुरंग सुभेदार, संजय चौगले, अमोल शेंडगे, अशोक सोलापुरे, राजेश मंडलिक, सचिन चव्हाण, प्रवीण पाटील आदींचा समवेश होता.