गोडसाखर सुरु करण्यास हिमालयासारखे उभे राहू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोडसाखर सुरु करण्यास हिमालयासारखे उभे राहू
गोडसाखर सुरु करण्यास हिमालयासारखे उभे राहू

गोडसाखर सुरु करण्यास हिमालयासारखे उभे राहू

sakal_logo
By

58988
------------------------------------------
गोडसाखर सुरु करण्यास
हिमालयासारखे उभे राहू
हसन मुश्रीफ : शाहू समविचारी शेतकरी आघाडीचा प्रचार प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना निवडणुकीत राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडीला सभासदांनी पाठबळ द्यावे. ही आघाडी निवडून आल्यानंतर कारखाना सुरु करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासह केडीसीसीच्या माध्यमातूनही हिमालयासारखे संचालक मंडळांच्या मागे उभे राहू, अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.
माद्याळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील सोमलिंग मंदिरातून आघाडीच्या प्रचाराला प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘कारखाना सुरु करण्यासाठी ही आघाडी काय करणार आहे हेच या निवडणुकीत सभासदांना सांगणार आहे. आघाडीच्या विजयानंतर शहापूरकर यांच्यावर चेअरमनपदाची जबाबदारी येणार आहे. त्यांच्यासह संचालक मंडळ कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न करतीलच. त्यासाठी लागेल ते सहकार्य करु. केडीसीसीच्या माध्यमातूनही कारखान्याला उर्जितावस्थेत आणण्यासाठी हिमालयासारखे उभे राहू.’
यावेळी सतीश पाटील यांनी उमेदवारांची ओळख करुन दिली. माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. प्रकाश शहापूरकर, किसनराव कुराडे, प्रकाश चव्हाण, उदयराव जोशी, हेमंत कोलेकर, राजेंद्र गड्ड्यान्नावर, सोमगोंडा आरबोळे, किरण कदम यांची भाषणे झाली. रवींद्र घेज्जी यांनी आभार मानले.