पाच दिवसात तीन लाखांवर भाविक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच दिवसात तीन लाखांवर भाविक
पाच दिवसात तीन लाखांवर भाविक

पाच दिवसात तीन लाखांवर भाविक

sakal_logo
By

58991

तीन लाखांवर भाविकांनी
घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

सलग सुट्यांची पर्वणी, आणखी दोन दिवस गर्दी राहणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः दिवाळीच्या सलग पाच दिवसांच्या सुटीची पर्वणी साधत पर्यटकांनी जिल्ह्यात मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. पाच दिवसांत तीन लाखांहून अधिक भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली.
सोमवारी (ता. २४) दिवाळीच्या मुख्य दिवशी सत्तर हजार ४५२, मंगळवारी (ता. २५) तीस हजार ५१२, बुधवारी (ता. २६) ५६ हजार ७७१, गुरुवारी (ता. २७) ६३ हजार २५२ तर आज सर्वाधिक ८५ हजारांवर भाविकांनी दर्शन घेतले. आणखी दोन दिवस ही गर्दी वाढण्याची शक्यता असून, देवस्थान समितीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, यंदा पर्यटनाच्या हंगामाला चांगलाच प्रारंभ झाला असून, सहकुटुंब पर्यटक जिल्ह्यात येत आहेत. सलग सुट्या व शनिवार-रविवारची सुटी जोडून सहकुटुंब पर्यटक दाखल होत असून, पार्किंगस्थळेही हाऊसफुल्ल होत आहेत.