परिख पुलाबाबत चर्चा करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिख पुलाबाबत चर्चा करणार
परिख पुलाबाबत चर्चा करणार

परिख पुलाबाबत चर्चा करणार

sakal_logo
By

परीख पुलाबाबत
रेल्वेशी संपर्क साधणार

कोल्हापूर, ता. २८ ः परीख पुलाच्या कामाबाबत महापालिका सोमवारी किंवा मंगळवारी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधणार आहे. परीख पूल नुतनीकरण समितीने आज महापालिकेत जाऊन शहर अभियंता कार्यालयातून माहिती घेतली.
शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत बैठकीत असल्याने शाखा अभियंता अरूण गवळी यांच्याकडे रेल्वेशी महापालिका प्रशासनाचा काही संवाद झाला का याबद्दल विचारणा केली. यावर गवळी यांनी संपर्क झालेला नसल्याचे सांगत सोमवारी किंवा मंगळवारी संपर्क साधू, असे सांगितले. महापालिका निवडणुकीचा या कार्यात अडथळा येऊ नये, यासाठी समिती आग्रही आहे. डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि युद्धपातळीवर पुलाचे काम जानेवारीपासून सुरू करावे यासाठी दहा दिवसांनी प्रशासनाचा पाठपुरावा करणार आहे. याप्रश्नी दिरंगाई किंवा दुर्लक्ष होत असल्यास प्रशासनाला समिती विचारणा करणार आहे. जीर्णावस्थेमुळे त्रासदायक ठरणाऱ्या परीख पुलाबाबत महापालिकेची भूमिका काय आहे, हे स्पष्ट करण्याबाबतही प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे समितीचे फिरोझ शेख, सुशील हंजे यांनी सांगितले.