सकाळ किल्ला स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ किल्ला स्पर्धा
सकाळ किल्ला स्पर्धा

सकाळ किल्ला स्पर्धा

sakal_logo
By

लोगो आणि फोटो- बुधवार २६ च्या टुडे ४ अँकरमधून
...........

चला, बालमित्रहो किल्ले बांधू या!
‘सकाळ- एनआयई''तर्फे शहरस्तरीय स्पर्धा, ‘माधव मिशन'' प्रायोजक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : दिवाळी सुटीत शालेय मुलांसह तरुणाईच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, या उद्देशाने ‘सकाळ-एनआयई’च्या वतीने कोल्हापूर शहरस्तरीय ‘चला, किल्ले बांधूया’ स्पर्धा होणार आहे. ‘माधव मिशन’ या स्पर्धेचे प्रायोजक असून, शहरातील बालमित्रांसह मंडळांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन ‘एनआयई’ परिवाराने केले आहे.
शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचे पोवाडे गात अवघ्या महाराष्ट्रात आजही किल्ले उभे आहेत. प्रत्येक किल्ल्याचा इतिहास वैशिष्ट्यपूर्ण तर आहेच; शिवाय तो सुवर्णाक्षरांनी सजलेला आहे. किल्ल्यावरील वास्तू, तटबंदी, दारू कोठार, नगारखाना, राजदरबार, जल व्यवस्थापन हा नेहमीच मराठी माणसाच्या कुतूहलाचा विषय राहिला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे मूक साक्षीदार असलेल्या या किल्ल्यांबद्दल आजही मराठी मनांत मोठा आदर आणि अभिमानही आहे. या किल्ल्यांसारखे छोटे-छोटे किल्ले साकारले जावेत आणि नव्या पिढीला महाराष्ट्रातील शौर्याचा इतिहास कळावा, या उद्देशाने ही स्पर्धा होणार आहे.

आकर्षक बक्षिसे...
किल्ला तयार करताना त्याचा नकाशा, अधिकृत संदर्भ आवश्यक तपासले जावेत. किल्‍ल्यासाठीचे साहित्य हे स्थानिक आणि पर्यावरणपूरक असावे. थर्माकोल, प्लास्टिक, प्लास्टरचा वापर टाळावा, आकार स्पष्ट होण्यासाठी स्केल वापरले तर अधिक चांगले ठरेल. इतिहास व घटना हे संदर्भ विचारात घेऊन वास्तू, ठिकाणे उभी करावीत. किल्ल्यावरील वृक्षांचे आच्छादन, जलस्त्रोत आवर्जुन दर्शवले जावेत. भौगोलिक सलग्न परिस्थिती दर्शवली जावी. नैसर्गिक रंग वापरून सजावट असावी. मावळे, खेळणी व इतर साहित्य स्वतः मुलांनी केलेले असल्यास विशेष गुण दिले जातील. पहिल्या तीन क्रमांकांसह उत्तेजनार्थ म्हणून आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून, परीक्षणानंतर पारितोषिक वितरण होणार आहे.
ठळक लावा- अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क ः उदय माळी- ९७६४६४७४३०

कोट
छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यशाली इतिहास नव्या पिढीला समजावा आणि त्यातून त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, या उद्देशाने ही स्पर्धा होत आहे. त्यामध्ये अधिकाधिक बालमित्र, तरुणाईने सहभाग नोंदवावा. ‘माधव मिशन'' अशा उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहिले आहे.
डॉ. आशुतोष देशपांडे, माधव मिशन