दारूच्या नशेत युवकाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारूच्या नशेत युवकाची आत्महत्या
दारूच्या नशेत युवकाची आत्महत्या

दारूच्या नशेत युवकाची आत्महत्या

sakal_logo
By

दारूच्या नशेत युवकाची
कळवीकट्टे येथे आत्महत्या

गडहिंग्लज, ता. २८ : कळवीकट्टे (ता. गडहिंग्लज) येथे एका युवकाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैभव नारायण पाटील (वय २०) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. गुरुवारी (ता. २७) दुपारी ही घटना निदर्शनास आली. वैभव हा दारूचा व्यसनी होता. गुरुवारी तो दारू पिऊन घरी आला. तेव्हा त्याला सरळ जेवताही येत नव्हते. त्यावेळी घरातील मंडळींनी त्याला ‘इतक्या कमी वयात तू दारू पितोस, हे तुला शोभत नाही, तुझे हे शिकायचे वय आहे,’ असे समजावून सांगितले. त्याचा राग मनात धरून वैभवने घराशेजारच्या जनावरांच्या गोठ्यातील लाकडी वाश्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत नारायण पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.