अर्बनच्या १५ जागांसाठी ३५ उमेदवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्बनच्या १५ जागांसाठी ३५ उमेदवार
अर्बनच्या १५ जागांसाठी ३५ उमेदवार

अर्बनच्या १५ जागांसाठी ३५ उमेदवार

sakal_logo
By

‘अर्बन’च्या १५ जागांसाठी
३५ उमेदवार रिंगणात

कोल्हापूर, ता. २८ : दि कोल्हापूर अर्बन को-ऑप बॅंकेसाठी १५ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. सोमवारी (ता. ३१) चिन्ह वाटप केले जाणार आहे. उमेश निगडे यांनी पॅनेलसाठी ‘कपबशी’ हे चिन्ह मागितले आहे. तर शिरीष कणेरकर यांनी विमान, कपबशी आणि पतंग या चिन्हांची मागणी केली आहे.

कोल्हापूर अर्बन बॅंकेसाठी होत असेलली निवडणूक विविध कारणांवरून रंगणार आहे. यामध्ये आता दोन्ही पॅनेल सक्षमपणे एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उतरले आहेत. दरम्यान, आज माघारीचे चित्र स्पष्ट झाले आहेत. दरम्यान, सर्वसाधारण गटातील १० जागांसाठी २२ उमेदवार, महिला गटातील २ जागांसाठी ४, इतर मागासवर्गीयमधून १ जागेसाठी ४, एससीमधून १ जागेसाठी ३ व एनटीमधील १ जागेसाठी २ उमदेवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.