जयशिवराय निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयशिवराय निवेदन
जयशिवराय निवेदन

जयशिवराय निवेदन

sakal_logo
By

५९११०

शासनाच्या धोऱणानुसार एफआरपी द्या
‘जयशिवराय’ची मागणी ; दत्त-दालमिया कारखान्याला निवेदन
...........
कोल्हापूर, ता. २९ ः गतवर्षीच्या हंगामाप्रमाणेच यावर्षीची एफआरपी न देता शासनाच्या धोरणानुसार ती मिळावी, यावर्षी जाहीर केलेल्या एफआरपीत प्रतिटन ७७ रु. वाढ करावी आदी मागण्यांचे निवेदन आज जयशिवराय किसान संघटनेच्यावतीने दत्त-दालमिया (आसुर्ले) साखर कारखन्याचे व्यवस्थापक गोसावी यांना दिले. कमी जाहीर केलेल्या एफआरपीचा जाबही संघटनेने व्यवस्थापनाला विचारल्यानंतर शासनाच्या धोरणानुसार एफआरपी जाहीर करण्याचे आश्‍वासन कारखाना व्यवस्थापनाने दिले.
‘दत्त दालमिया’ कारखान्याने गेल्या गळीत हंगामात एफआरपी ३१४६ रु. दिली होती. यावर्षी केंद्र शासनाने ही १०.२५ टक्के उताऱ्याला १५० रुपये वाढ केलेली आहे. परंतु त्यांनी रिकव्हरीचा बेस .२५ टक्क्यांनी वाढविल्यामुळे ७३ रु. कमी होतात. हे कमी केलेले सोडून सर्वसाधारण गतवर्षीपेक्षा प्रतिटन ७७ रुपये वाढ होत आहे. तरीही ‘दालमिया’ने पहिली उचल प्रतिटन ३१०० रुपये जाहीर करून शेतकऱ्यांचे नुकसान केलेले आहे. याला स्वाभिमानीने मान्यता देऊन शेतकऱ्यांशी बेईमानी केलेली आहे. पुढील आठवड्यात धोरणात्मक निर्णय नाही झाला तर कारखान्याच्या सर्व ऊसतोडी रोखण्याचा इशारा जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिला. शिष्टमंडळात दत्ता पाटील, संजय पाटील, शीतल कांबळे, सचिन पाटील, तानाजी माने आदींचा समावेश होता.