कंपनीचे शोरूम फोडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंपनीचे शोरूम फोडले
कंपनीचे शोरूम फोडले

कंपनीचे शोरूम फोडले

sakal_logo
By

मार्केट यार्डमधील शोरूम फोडले

चोरट्यांचा सव्वाआठ लाखांच्या स्पेअर पार्टवर डल्ला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २९ ः मार्केट यार्ड येथील कंपनीचे शोरूम फोडून चोरट्यांनी सव्वाआठ लाख रुपये किमतीचे इंजिनचे स्पेअर पार्ट चोरून नेले. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड परिसरात डेल्ट्रॉन सेल्स अँन्ड सर्व्हिसेस ही कंपनी आहे. ही कंपनी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे बंद केली. दरम्यान, चोरट्यांनी कंपनीच्या मागील गेटचे कुलूप तोडले. त्याने शटर उचकटून स्टोअर रूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी येथील वेगवेगळे ८ लाख २९ हजार ४५० रुपयांचे स्पेअर पार्ट चोरून नेले. हा प्रकार गुरुवारी (ता.२७) सकाळी साडेदहाच्या सुमारास निदर्शनास आला. याबाबतची फिर्याद कंपनीमार्फत महेश गोसावी यांनी दिली. घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली. उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण अधिक तपास करीत आहेत.