आजरा अर्बनकडे पाच कोटी ६० लाखांच्या ठेवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा अर्बनकडे पाच कोटी ६० लाखांच्या ठेवी
आजरा अर्बनकडे पाच कोटी ६० लाखांच्या ठेवी

आजरा अर्बनकडे पाच कोटी ६० लाखांच्या ठेवी

sakal_logo
By

L59303
डॉ. अनिल देशपांडे

आजरा अर्बनकडे पाच कोटी ६० लाखांच्या ठेवी जमा
आजरा, ता. २९ : दि आजरा अर्बन बॅंकेकडे (मल्टिस्टेट) दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एका दिवसात तब्बल पाच कोटी ७० लाख ५५ हजार ४७० रुपयांच्या ठेवी जमा झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बॅंकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकाचा दृढ विश्‍वास असल्यामुळे ग्राहकांनी ठेवी ठेवल्या आहेत. सध्या बॅंकेकडे ७५९ कोटी १२ लाख रुपयांच्या ठेवी व ४७१ कोटी चार लाख रुपयांची कर्ज आहेत. यासाठी उपाध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, बॅंकेच अधिकारी, कर्मचारी, ग्राहक व हितचिंतकांनी चांगले सहकार्य केल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.