चाला, आरोग्यासाठी, अध्यात्मिक आनंदासाठी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाला, आरोग्यासाठी,
अध्यात्मिक आनंदासाठी!
चाला, आरोग्यासाठी, अध्यात्मिक आनंदासाठी!

चाला, आरोग्यासाठी, अध्यात्मिक आनंदासाठी!

sakal_logo
By

चाला, आरोग्यासाठी,
आध्यात्मिक आनंदासाठी!
कोल्हापूरकरांची दोन दशकांची गणपतीपुळे पायी वारी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः पंढरपूरच्या वारीबरोबरच कोल्हापूरकरांनी आध्यात्मिक आनंद आणि सर्वांगीण आरोग्यासाठी म्हणून सुरू केलेल्या कोल्हापूर-गणपतीपुळे पायी वारीला यंदा वीस वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा नऊ नोव्हेंबरपासून या पायी वारीला प्रारंभ होणार असून, पंचाहत्तर गणेशभक्तांचा त्यामध्ये सहभाग असणार आहे. एकूण साडेतीन दिवसांची ही पायी वारी असेल. दरम्यान, जोतिबा सेवा संस्था, जोतिबा मॉर्निंग वॉकर्स ग्रुप, पट्टणकोडोली मॉर्निंग वॉकर्स ग्रुपतर्फे ही वारी होणार आहे.
-------------
यासाठी होते वारी...
आध्यात्मिक आनंदाबरोबरच पायी वारी हा आनंदाचा, फिरण्याचा, थ्रिल अनुभवण्याचा, निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न आहे. आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडणे आणि घनदाट झाडी डोंगर, कडे-कपारी, वेली, झरे-नदी या सर्वांतून पायी मार्गक्रमण करताना मिळणारा आनंद अवर्णनीय ठरतो. या भटकंतीत नवीन लोकांची ओळख, आचार विचारांची देवाण-घेवाण होते. त्याशिवाय अलीकडच्या काळाचा विचार केला तर धावपळीच्या जगण्यातून स्वतःसाठीची स्पेस निर्माण करून स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देता येतो.
-----------------
अशी होईल वारी...
- रोज पन्नास किलोमीटरचा पायी प्रवास
- शिवाजी पूल येथून सकाळी सहाला वारीला प्रारंभ
- पन्हाळा, बांबवडेमार्गे मलकापूर येथील नृसिंह मंदिरात विश्रांती
- दुसऱ्या दिवशी मलकापूर येथून प्रारंभ, आंबा-साखरपामार्गे देवरूख येथे विश्रांती
- तिसऱ्या दिवशी देवरूखमार्गे प्रारंभ आणि चौथ्या दिवशी गणपतीपुळे येथे दर्शन आणि पुन्‍हा परतीचा प्रवास
-----------
कोट
प्रत्येक संकष्टीला गणपतीपुळेला जाणाऱ्या भाविकांची कोल्हापुरात मोठी संख्या आहे. मात्र, आम्ही वीस वर्षांपूर्वी पायी वारीची संकल्पना पुढे आणली ही परंपरा आजतागायत कायम आहे. या वारीमुळे सात्विकता वाढीस लागते. स्वतःचा आत्मविश्वास वाढतो आणि वर्षातून एकदा ही वारी केली की वर्षभर फिटनेसच्या जोरावर आरोग्याचेही कुठलेही प्रश्न निर्माण होत नाहीत, हा आमचा अनुभव आहे. वारीत सहभागी होणाऱ्यांकडून चहा, नाष्टा व जेवणाचा खर्च फक्त घेतला जातो.
- सुशील कोरडे, संस्थापक अध्यक्ष, जोतिबा सेवा संस्था