सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्कार
सत्कार

सत्कार

sakal_logo
By

59196

१० तोळ्याचे दागिने प्रामाणिकपणे
परत करणाऱ्या मोरे यांचा सत्कार

कोल्हापूर : जीवबानाना पार्क रस्त्यावर सापडलेले १० तोळे सोन्याचे दागिने निवृत्त शिक्षकाला विशाल मोरे (रा. पोर्ले, ता. पन्हाळा) यांनी प्रामाणिकपणे परत केले. त्याबद्दल मनसेचे संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे यांच्या हस्ते श्री अंबाबाई देवीची चांदीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष विजय करजगार, पुंडलिक जाधव, गजानन जाधव, नागेश चौगुले, शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मेन राजाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. नाईक, देवीचंद ओसवाल, प्रताप पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी फिरस्त्यांना दिवाळीनिमित्त मिठाई वाटप करण्यात आली.
---------
मोफत तपासणी शिबिर २ नोव्हेंबरला
कोल्हापूर ः मुंबईतील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अंबळकर यांचे सोरायसिस आणि त्वचारोगविषयी मोफत मार्गदर्शन व तपासणी शिबिर होणार आहे. कदमवाडी रोड येथील राज गौरव हॉलमध्ये २ नोव्हेंबरला सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत हे शिबिर होणार आहे. याचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहान दीपाली पोरे यांनी केले.