प्रदर्शनातून उलगडले शिल्पसौंदर्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदर्शनातून उलगडले शिल्पसौंदर्य
प्रदर्शनातून उलगडले शिल्पसौंदर्य

प्रदर्शनातून उलगडले शिल्पसौंदर्य

sakal_logo
By

59167
कोल्हापूर ः नाईट कॉलेज ऑफ आर्टस् ॲण्ड कॉमर्सच्या समाजशास्त्र विभागातर्फे आयोजित प्रदर्शनाचे उद्‍घाटन करताना डॉ. विश्वनाथ मगदूम. शेजारी ॲड. अमित बाडकर, ॲड. वैभव पेडणेकर, प्राचार्य डॉ. एस. जे. फराकटे, डॉ. महेंद्रकुमार जाधव, डॉ. अखिला गावडे आदी.
------------------------------------------

प्रदर्शनातून उलगडले ‘कलापूरचे शिल्पसौंदर्य’

‘सकाळ’च्या ‘रंग कोल्हापुरी’ पुरवणीतील लेखांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : कलापूरच्या शिल्पसौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ घातली आहे. मात्र, प्रत्येक शिल्पामागील शिल्पकाराचा विचार, त्याची शैली, विविध वैशिष्ट्ये अशा अनुषंगाने पहिल्यांदाच ‘सकाळ’च्या माध्यमातून सर्वंकष माहिती वाचकांना मिळाली. ती अधिकाधिक लोकांपर्यंत आणि विशेषतः नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने नाईट कॉलेज ऑफ आर्टस् ॲण्ड कॉमर्सच्या समाजशास्त्र विभागाने पुढाकार घेतला आहे. ‘रंग कोल्हापुरी’ या साप्ताहिक पुरवणीतील ‘शिल्पसौंदर्य’ या सदरातील सर्व लेखांचा या प्रदर्शनात समावेश असून, नुकत्याच झालेल्या पहिल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त हे प्रदर्शन झाले. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्‍वनाथ मगदूम यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. ‘शिल्पसौंदर्य’ या सदरातून नव्या पिढीला आपल्या प्रेरणास्थानांविषयीची विविध अंगांनी माहिती मिळत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. महेंद्रकुमार जाधव यांनी प्रदर्शनाचे संयोजन केले. त्यांच्याच संकल्पनेतून हे प्रदर्शन आकाराला आले. शहरातील प्रत्येक पुतळ्यांचे बारकावे अजय दळवी यांनी या सदरातून सांगितले आहेत आणि ते नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही या लेखांचे प्रदर्शन भरविले आहे. ज्यांना हे प्रदर्शन हवे असेल, त्यांच्यासाठीही नंतर आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, ॲड. अमित बाडकर, ॲड. वैभव पेडणेकर, प्राचार्य एस. जे. फराकटे, डॉ. अखिला गावडे आदी उपस्थित होते.