आजरा ः मधमाशांच्या हल्यात जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः मधमाशांच्या हल्यात जखमी
आजरा ः मधमाशांच्या हल्यात जखमी

आजरा ः मधमाशांच्या हल्यात जखमी

sakal_logo
By

सोहाळेत मधमाशांच्या
हल्ल्यात सात जण जखमी

आजरा, ता. २९ ः सोहाळे (ता. आजरा) येथे मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले. आज सकाळी यल्लाप्पा कांबळे यांच्या शेतात ही घटना घडली. आजरा ग्रामीण रुग्णालय येथे जखमींवर उपचार सुरू आहेत. सध्या तालुक्याच्या पश्चिम भागात सुगीची कामे जोरात सुरू आहेत. सोहाळे परिसरात भातकापणीचे काम सुरू आहे. यल्लापा कांबळे हे देखील कुटुंबासह भात कापणीसाठी ‘हेळमारकी’च्या शेतात गेले होते. भात कापत असताना अचानक एका झाडावरील मधमाशाच्या पोळ्याला धक्का लागल्यामुळे माशा उठल्या. त्यांनी भात कापणी करणाऱ्यांवर हल्ला केला. यामध्ये यल्लाप्पा कांबळे व माधवी कांबळे हे गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर संजय कांबळे, उषा कांबळे, विमल कांबळे यांच्यासह दोन मुलेही जखमी झाली.