इचल ः डेक्कन प्रोसेस निवडणूक निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल ः डेक्कन प्रोसेस निवडणूक निकाल
इचल ः डेक्कन प्रोसेस निवडणूक निकाल

इचल ः डेक्कन प्रोसेस निवडणूक निकाल

sakal_logo
By

डेक्कन प्रोसेसर्स निवडणुकीत
सत्तारुढ पॅनेलचे वर्चस्व

इचलकरंजी, ता.२९ ः अत्यंत चुरशीच्या बनलेल्या दि डेक्कन को-ऑप. टेक्स्टाईल इंडस्ट्रीज तथा डेक्कन प्रोसेसर्स या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कामगार नेते शामराव ऊर्फ अशोक कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ सहकारमहर्षी दत्ताजीराव कदम विचार पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला. सर्व १३ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. विरोधी डेक्कन प्रोसेस विकास पॅनेलला एकही जागा मिळाली नाही.
दि डेक्कन को-ऑप. टेक्स्टाईल इंडस्ट्रीज संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. १३ जागांसाठी दोन पॅनेलमध्ये चुरस निर्माण झाली होती. निवडणुकीपूर्वीच सत्तारूढ पॅनेलने अनुसूचित जाती जमाती गटातून अरुण शिंगे तर भटके विमुक्त जाती जमाती गटातून दीपक साहू यांची बिनविरोध निवड झाली होती. तर उर्वरित ११ जागांसाठी निवडणूक झाली. ५२२ मतदारांपैकी ३५२ जणांनी मतदान केले. शनिवारी सकाळी विठ्ठल रामजी शिंदे शाळेत मतदान पार पडले. मतदानानंतर सायंकाळी मतमोजणी पार पडली. त्यामध्ये सत्तारूढ पॅनेलमधील सर्वसाधारण गटात बापूसाहेब नेमू तेरदाळे (१९९), राजेंद्र दत्तात्रय बचाटे (१९२), गिरीश अशोक कुलकर्णी (१९०), नंदकुमार सदाशिव कुलकर्णी (१८७), संजय नेमू माणगावे (१८२), भरत भूपाल कुंभोजे (१८०), सुरेश अण्णासाहेब धनवडे (१७८), मन्सूर अब्बास मुजावर (१७०), महिला गटात विजयालक्ष्मी अशोक कुलकर्णी (१९४) व जयश्री शिवाजी भोसले (१८२), विशेष मागास प्रवर्ग गटात रावसाहेब आप्पा धनगर (१९४) विजयी झाले. निकालनानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला.