आवश्यक- संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक- संक्षिप्त
आवश्यक- संक्षिप्त

आवश्यक- संक्षिप्त

sakal_logo
By

५९१९१
शिल्पा मनवानी ‘मिसेस महाराष्ट्र’
कोल्हापूर ः दिवा पेजीएनंट्सचे संस्थापक कार्ल व अंजना मस्केंरान्स यांनी आयोजित केलेली ‘मिसेस महाराष्ट्र २०२२’ स्पर्धा पुणे येथे झाली. यामध्ये कोल्हापूरच्या शिल्पा किशोर मनवानी यांनी ‘मिसेस महाराष्ट्र २०२२’ रनर अप विजेतेपद पटकावले. त्यांनी फॅशन आयकॉनचा पुरस्कारही जिंकला. अल्टिमेट दिवाचा सब टायटलही त्यांना देण्यात आला. स्पर्धेत देशभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. टॅलेंट राऊंड, प्रश्नमंजूषा, पारंपरिक पेहराव अशा विविध स्पर्धांतून अंतिम फेरीसाठी निवड झाली. अंतिम फेरीमध्ये शिल्पा यांना किताब मिळाला. प्रसिद्ध अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या हस्ते त्यांना मानाचा क्राऊन प्रदान करण्यात आला. सिंधी समाजातून प्रथमच एका महिलेने हा मान पटकावल्याचा दावा शिल्पा यांनी केला आहे.
...........
५९१९०
महादेव दूध संस्थेतर्फे शियेत सत्कार
कोल्हापूर ः शिये (ता.करवीर) येथील महादेव दूध संस्थेतर्फे जादा दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांचा सत्कार झाला. यावेळी दूध फरकाचेही वितरण झाले. सध्या दूधाला मागणी जास्त आणि पुरवठा कमी असे चित्र असून शेतकऱ्यांनी दूध उत्पादनाकडे वळावे, असे आवाहन यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष किरण चौगले होते. तंटामुक्त समिती अध्यक्ष पांडुरंग पाटील, विलास जाधव, दत्तात्रय गाडवे, सरपंच शीतल मगदूम, माजी सरपंच बी. डी. पाटील, हनुमान सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रवीण चौगले, शशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकाश पाटील यांनी स्वागत केले. चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले.