लाचलुचपत प्रतिबंधक विभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

sakal_logo
By

भ्रष्टाचारमुक्तीसाठी उद्यापासून जनजागृती
कोल्हापूर, ता. २९ ः ‘भ्रष्टाचारमुक्त भारत विकसित भारत’ ही संकल्पना घेऊन ३१ ऑक्‍टोबर ते ७ नोव्‍हेंबर कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत सर्व शासकीय, सहकारी संस्‍थांमध्‍ये ३१ ऑक्‍टोबरला सकाळी ११ वाजता भ्रष्‍टाचार निर्मूलनाची शपथ देण्‍यात येणार आहे. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्‍यासाठी नागरिकांचे प्रबोधन म्‍हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन या सप्‍ताहामध्‍ये केले आहे. दक्षता जनजागृती सप्ताहाची माहिती सध्‍या आकाशवाणी, वृत्तपत्ते, विविध वृत्तवाहिन्या, सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्‍यात येत आहे. भ्रष्‍टाचाराविरोधातील तक्रार कशी करावी याबाबतची माहिती ध्‍वनिचित्रफितीद्वारे देण्‍यात येईल. यासाठी एलईडी स्‍क्रीन असलेल्‍या मोबाईल व्‍हॅनची व्‍यवस्‍था केली आहे. विविध सामाजिक संस्थेच्या मदतीने प्रमुख शासकीय कार्यालये, रिक्षा स्टॅन्ड, एस.टी. स्टॅन्ड व रेल्वे स्टेशनमध्ये पत्रके, भित्तीपत्रके, बॅनर लावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील टोल फ्री क्रमांक १०६४ व मोबाईल ॲपबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोचविण्‍यात येणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.