स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास सर्वतोपरी सहकार्य : मुश्रीफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास सर्वतोपरी सहकार्य : मुश्रीफ
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास सर्वतोपरी सहकार्य : मुश्रीफ

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास सर्वतोपरी सहकार्य : मुश्रीफ

sakal_logo
By

59197
करंबळी : दत्तप्रसाद पतसंस्थेच्या सभागृहाच्या उद्‍घाटनप्रसंगी हसन मुश्रीफ, जयंत आसगावकर, के. बी. पोवार, उदय जोशी, प्रवीण माळी आदी.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास
सर्वतोपरी सहकार्य : मुश्रीफ
दत्तप्रसाद संस्थेच्या सभागृहाचे करंबळीत उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : करंबळीच्या दत्तप्रसाद सहकारी पतसंस्थेची सचोटी, सेवा व विश्‍वासार्हतेवर सुरू असलेली घोडदौड कौतुकास्पद आहे. संस्थेच्या नूतन सभागृहात सुसज्ज ग्रंथालयासह स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा मानस संस्थापक के. बी. पोवार यांचा आहे. त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.
करंबळी येथे दत्तप्रसाद पतसंस्थेच्या नूतन सभागृहाचे उद्‍घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार जयंत आसगावकर अध्यक्षस्थानी होते. संस्थेने स्वीकारलेले अनाथांचे पालकत्वही गौरवास पात्र असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
आमदार आसगावकर म्हणाले, ‘‘संस्थेचे संस्थापक पोवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेच्या माध्यमातून चांगले कार्य सुरू केले आहे. गावातच ग्रंथालयासह स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास असून त्यासाठी लागणार पुस्तके, प्रिंटर व निधी देण्यास सहकार्य करू.’’
संस्थापक के. बी. पोवार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन सभागृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, लहान मुलांसाठी संस्कार केंद्र व ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचा मानस असल्याचे सांगितले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांसह निवृत्त सभासदांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास उदय जोशी, सतीश पाटील, सरपंच प्रवीण माळी, बी. जी. काटे, मुख्याध्यापक राज्य महामंडळाचे उपध्यक्ष व्ही. जी. पोवार, उपसरपंच राहुल येसादे, उदय पाटील संभाजीराव पाटील, बळवंतराव मोटे, सहायक निबंधक अमित गराडे, अ‍ॅड. विकास पाटील आदी उपस्थित होते.