हॅम रेडिओवरील संवादाने दुंडगेत विद्यार्थी भारावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हॅम रेडिओवरील संवादाने दुंडगेत विद्यार्थी भारावले
हॅम रेडिओवरील संवादाने दुंडगेत विद्यार्थी भारावले

हॅम रेडिओवरील संवादाने दुंडगेत विद्यार्थी भारावले

sakal_logo
By

59199
दुंडगे : ऑल इंडिया रेडिओचे प्रमुख मंजुनाथ शिंदे यांचा सत्कार करताना संजय केवडे. शेजारी डॉ. बाळकृष्ण हेगडे व इतर शिक्षक.

हॅम रेडिओवरील संवादाने
दुंडगेत विद्यार्थी भारावले
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : जिल्हा भारत स्काउट गाईड संस्थेतर्फे जाम्बोरी ऑन द एअर (जोटा) या कार्यक्रमाचे आयोजन गडहिंग्लज तालुक्यात करण्यात आले. या अंतर्गत दुंडगे येथे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय असे दोन टॉवर उभे केले होते. माजी नौसैनिक बसाप्पा आरबोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
ऑल इंडिया रेडिओचे प्रमुख मंजुनाथ शिंदे, राणी कित्तुर चनम्मा विद्यापीठाचे प्रा. डॉ. बाळकृष्ण हेगडे, जिल्हा संघटक संजय केवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना या हॅम रेडिओचे महत्त्व विशद केले. अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. ओंकार चोपडे, आयेशा हलकर्णी, गिरिजा सुतार, मंथन पाटील, रोहिणी पाटील यांनी सहभाग घेतला.
या वेळी श्रीराम हायस्कूल (नांगनूर)मधील विद्यार्थ्यांनी प्रणिता कुलकर्णी, दत्तात्रय वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र हायस्कूल (अत्याळ)मधील विद्यार्थ्यांनी जगदीश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली दुंडगेसह तिन्ही शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मंजुनाथ शिंदे, डॉ. हेगडे यांची भाषणे झाली.
एस. डी. देसाई, आर. के. नुली, मदन दंडगीदास, संगीता पाटील, अजित पाटील, नांगनूरचे मुख्याध्यापक अशोक कल्याणी, एस. डी. वाडकर, तानाजी आमगे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. अविनाश कुलकर्णी यांनी स्वागत केले. राजीव सुतार यांनी सूत्रसंचालन केले. गणेश खरात यांनी आभार मानले.