नरेवाडीतील आरोग्य शिबिराला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरेवाडीतील आरोग्य शिबिराला प्रतिसाद
नरेवाडीतील आरोग्य शिबिराला प्रतिसाद

नरेवाडीतील आरोग्य शिबिराला प्रतिसाद

sakal_logo
By

नरेवाडीतील आरोग्य शिबिराला प्रतिसाद
नूल : नरेवाडी येथे हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र व संत गजानन महाराज हॉस्पिटल महागाव यांच्यातर्फे ३० वर्षांवरील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात उच्च रक्तदाब, डोळे तपासणी व अन्य चाचण्या करण्यात आल्या. शिबिराला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेळी संत गजानन महाराज हॉस्पिटलच्या अर्चना उगले व त्यांचे सर्व सहकारी, आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी खुशबू सय्यद, आरोग्यसेविका सावित्री जाधव, माया कुंभार, बाळाबाई कोळी, आरोग्यसेवक किरण सुतार, आशा वर्कर्स लता पाटील, मेघा दंडवते उपस्थित होते.