घाटगेंच्या जनता दरबारात गडहिंग्लजकरांचा अर्ज निर्गत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटगेंच्या जनता दरबारात गडहिंग्लजकरांचा अर्ज निर्गत
घाटगेंच्या जनता दरबारात गडहिंग्लजकरांचा अर्ज निर्गत

घाटगेंच्या जनता दरबारात गडहिंग्लजकरांचा अर्ज निर्गत

sakal_logo
By

घाटगेंच्या जनता दरबारात
गडहिंग्लजकरांचा अर्ज निर्गत
गडहिंग्लज, ता. ३० : कागल येथे समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत झालेल्या जनता दरबारात गडहिंग्लजमधील शंकर बिलावर, वामन बिलावर व किसन बिलावर यांनी दिलेल्या अर्जाची निर्गत केली. केडीसीसी बँकेच्या परिपत्रकात सरसकट कर्जासाठी तारण गहाण दस्त सादर करण्याची अट होती, परंतु अनुसूचित जातीचे बेघर भूमिहीन असल्याने तारण देणे शक्य नव्हते. लिडकॉम तसेच खादी ग्रामोद्योग व अन्य महामंडळाकडून ५० टक्के अनुदान असताना म्हणजे दहा हजार कर्ज व दहा हजार अनुदान प्रस्तावावेळी तारण अट रद्द व्हावी, असे निवेदन दिले आहे. केडीसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षेत सविस्तर चर्चा झाल्यानंतर तसा अर्ज देण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार अर्ज सादर केला आहे. यामुळे आता वीस हजारांच्या कर्ज अनुदान प्रस्तावासाठी तारण म्हणून गहाणखत नोंदणीकृत करून देण्याची आवश्यकता नाही. या पद्धतीने जनता दरबारात दाद मिळाल्याची माहिती वामन बिलावर यांनी दिली.